Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचे शुभारंभासह पुणे मेट्रोची सुरुवात, किती आहेत तिकीट दर, जाणून घ्या

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचे शुभारंभासह पुणे मेट्रोची सुरुवात, किती आहेत तिकीट दर, जाणून घ्या
, रविवार, 6 मार्च 2022 (17:13 IST)
पुणे मेट्रोचे शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन असा मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे पुणे मेट्रोने सर्वसामान्यांचा प्रवास सुरू झाला. याशिवाय पुणेकरांसाठी 100 इलेक्ट्रिक बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत.

पेट्रोलच्या वाढत्या किमतीत, ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाच्या सतत वाढत चाललेल्या समस्या लक्षात घेता पुणेकरांसाठी ही मोठी भेट आहे. पुणे आणि पिंपरी या दोन मार्गांवर सुरू झालेल्या पुणे मेट्रोमध्ये आपण  दररोज सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवास करू शकता. लवकरच दोन नवीन मार्गांवरही मेट्रो सुरू होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्यातच सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पुण्यातील सुमारे साडेतीनशे किलोमीटरच्या मेट्रोचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 12 किमीपर्यंतचे मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी हा एकेरी मार्ग 13 किलोमीटरचा आहे. या मार्गात वनाज ते गरवारे असा 5 किलोमीटरचा मार्ग तयार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या 12 किलोमीटरच्या मार्गात पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी ते 7 किलोमीटरचा मार्ग तयार आहे. म्हणजेच सध्या एकूण 12 किलोमीटरमध्ये मेट्रो धावत आहे. सध्या साडे 21 किलोमीटरपर्यंतच्या मार्गाचे काम बाकी आहे.
 
वनाज ते गरवारे तिकीट दर
सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत तुम्ही पुणे मेट्रोने प्रवास करू शकता. तीन स्थानकांपर्यंतच्या तिकिटांसाठी 10 रुपये मोजावे लागतील. तीन स्थानकांच्या पलीकडे जाण्यासाठी 20 रुपये तिकीट दर आहे. म्हणजेच वनाझ मेट्रोमध्ये बसल्यास सध्या या मार्गात पाच स्थानके आहेत. पहिल्या तीन स्थानकांसाठी दहा रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. पुढच्या दोन स्टेशनवर जायचे असेल तर वीस रुपये मोजावे लागतील. म्हणजे वनाज ते गरवारे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटच्या स्थानकापर्यंत गेल्यास पाच स्थानके येतील. यासाठी आपल्याला वीस रुपये द्यावे लागतील.
 
पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी तिकीट दर
तसेच पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ 20 रुपये तिकीट आहे. मेट्रोला दोन्ही मार्गांवर तीन डबे आहेत. प्रत्येक डब्यात 325 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. तीन डब्यापैकी एक डबा महिलांसाठी राखीव आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतात आग लागून 100 एकर ऊस जळून खाक