Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीस अश्लील शब्द वापरल्याने मित्राने केला मित्राचा खून

Friend murdered friend for using obscene words to wife Maharashtra News Pune Marathi News Webdunia Marathi
, बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:17 IST)
दारू प्यायल्यानंतर मित्राने पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याने मित्राने मित्राचा खून केला.ही घटना सोमवारी  सायंकाळी सुस रोड, बाणेर येथे उघडकीस आली.खून केल्यानंतर आरोपी मूळ गावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.अच्युत भुयान (वय 37,रा. सुस रोड,बाणेर पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कमल राजन शर्मा (वय 18, रा. सुस रोड, बाणेर, पुणे)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच राज्यातील होते.तसेच ते एकाच सिक्युरिटी कंपनीत काम करत होते.दोन दिवसांपूर्वी मृत इसमाने आरोपीचे पत्नीवर अश्लील कमेंट केल्याने त्यांची भांडणे झाली होती.घटनेच्या दिवशी मृत हा घरी होता.आरोपी हा कामावरून घरी आला व तेथे त्याने मृत इसमास दारू पाजली व त्यानंतर दारूच्या नशेत मृत इसमाने पुन्हा आरोपीचे पत्नी बाबत अश्लील कमेंट केल्याने आरोपी व मृत व्यक्तिसोबत भांडणे झाली.त्यावेळी आरोपीने लांब रुमालाने मित्राचा गळा आवळून खून केला व तेथून पुन्हा कामावर गेला.
 
मृताच्या खोलीवर स्वयंपाक करणारी महिला सोमवारी सायंकाळी पाच वाजता आली असता तीला मृताच्या गळ्याला फास अडकवलेल्या पस्थितीमध्ये दिसून आला.तीने ताबडतोब घरमालक नलावडे यांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
 
हिंजवडी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी आसाम येथे जात होता.स्थानिक नागरिकांशी चौकशी करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! पुण्यात बुवाबाजी करून पती, सासू, सासऱ्याने सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त; त्यानंतर केला ‘हा’ भयंकर प्रकार