Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (17:08 IST)
शाळेत मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल शिकवले जाते. या सत्रादरम्यान पुण्यात एका शाळेत 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शिक्षकाला जे सांगितले ते धक्कादायक आहे.मुलीने सांगितले की, तिच्या वडील, काका आणि चुलत भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सर्व आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. 
 
सदर घटना पुण्यातील हडपसर भागातील आहे. या अल्पवयीन मुलीवर 2023 मध्ये तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केले आणि कोणालाही न सांगण्याचा दम दिला. त्यानंतर मुलीच्या काकाने 2024 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तिने काकाच्या कृत्याचा निषेध केला आणि आरडाओरड केली. काकाने तिचे तोंड बंद केले आणि बेदम मारहाण केली. 
 
शाळेत गुड टच बॅड टचचे सत्र सुरू असताना मुलीने याबाबत शिक्षिकेला सांगितले आणि शिक्षिकेने पोलिसांशी संपर्क साधला.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्व आवश्यक प्रोटोकॉल लक्षात घेऊन POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
 
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याआधारे हडपसर पोलिसांनी भादंविच्या कलम 376,376 (i), 323, 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 22 जून रोजी एफआयआर नोंदवून तिघांनाही अटक केली आहे. 
सध्या मुलीची आई गावी गेली आहे. ती परत आल्यावर अल्पवयीन मुलीच्या आईचा जबाब पोलीस नोंदवणार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. 

Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....

Navratri 2025 नवरात्रीच्या देवीला नऊ माळा

Navratri 2025 Wishes in Marathi नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीत

नवरात्रीत लिंबू का कापू नये?

नवरात्रीत उपवास करू शकत नसाल तर हे ३ उपाय व्रत करण्याइतकेच पुण्य देतील

सर्व पहा

नवीन

दिग्गज पंच डिकी बर्ड यांचे निधन, यॉर्कशायर क्रिकेट क्लबने श्रद्धांजली वाहिली

नाशिक: देवळालीमध्ये बिबट्याने सैनिकाच्या दोन वर्षांच्या मुलाला उचलून नेले

मराठवाड्यात पावसाचा कहर, संजय राऊत यांचे पंतप्रधानांना आवाहन

पत्नीवर चाकूने ४० वेळा वार, क्राईम पेट्रोल पाहून कट रचणार्‍या पतीला अटक

LIVE: महाराष्ट्र सरकार आता 9 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी 5 लाख रुपये देणार

पुढील लेख
Show comments