Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोणावळ्याच्या जंगलातून तरुण बेपत्ता, शोधणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस

One lakh reward for missing youth from Lonavla forest लोणावळ्याच्या जंगलातून तरुण बेपत्ता
, मंगळवार, 24 मे 2022 (13:51 IST)
दिल्लीतून आलेला तरुण लोणावळ्याच्या जंगलात फिरायला गेला आणि बेपत्ता झाला. फरान सेराजुद्दीन असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे.हा एक रोबोटिक कंपनीत अभियंता म्हणून काम करतो.  तो दिल्लीतून लोणावळा फिरायला आला आणि नागफणी पॉईंटला फिरायला एकटाच गेला. फरान शुक्रवारी पुण्यात कामाच्या निमित्ताने आला होता. आणि एकटाच फिरायला गेला. जंगलात जाताना ज्या रस्त्याने गेला तोच रास्ता चुकला त्याने आपल्या भाऊ- आई वडिलांना फोनवरून आपण रास्ता चुकल्याची कल्पना दिली. त्याच्या कुटुंबियांनी लोणावळा पोलिसांना या बाबतचे कळविले. पोलिसांनी फरानच्या मोबाईलवर फोन केला तो पर्यंत त्याचा फोन बंद झाला होता. त्याला जंगलातून बाहेर येणाचे मार्ग सापडले नाही आणि तो भरकटत जंगलात निघून गेला शी शक्यता वर्तवली जात असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. फरानच्या कुटुंबीयांनी त्याला शोधून आणणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टोमॅटोचे भाव वधारले, टोमॅटो ने शंभरी गाठली