सध्या पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे.पुण्यात एक बार आणि पब रविवारी ठरलेल्या वेळेपेक्षा पहाटे 5 पर्यंत उघडे होते. मध्यरात्री या बार मध्ये काही तरुणांनी ड्रग्ज पार्टी केली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या या प्रकरणात राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पोलीस खात्याच्या दोन अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आता या विभागाने या प्रकरणी जबाबदार धरून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निरीक्षक विठ्ठल बोबडे आणि सहनिरिक्षक अनंत पाटील या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
या प्रकरणी पूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने, सहाय्यक निरीक्षक दिनेश पाटील हवालदार गोरख डोईफोडे, पोलीस शिपाई अशोक आडसूळ या दोन बीट मार्शलचे निलंबन केले आहे. आता या प्रकरणी किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते हे पाहण्यासारखे आहे.