Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंतरराष्ट्रीय पेंटिंग व्यवहारात पुण्यातील व्यावसायिकाला घातला 4.5 कोटींना गंडा

Pune-based businessman embezzled Rs 4.5 crore in international painting business Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (15:52 IST)
आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगच्या खरेदी व्यवहारात नायजेरियन सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) ई मेल हॅक करुन पुण्यातील व्यावसायिकाला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर परिसरातील एका 48 वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिसांना (Mundhwa Police) फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की,व्यावसायिकाने यांची केटी एमएस प्रॉपर्टीज ही कंपनी आहे.खळदकर यांच्या केटीएम एस प्रॉपर्टीज या कंपनीमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगची खेरदी विक्री केली जाते.

कंपनीचा परदेशातील जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर मौल्यवान पेंटिंग खरेदी करण्याचा व्यवहार सुरु होता.सायबर चोरट्याने जेरार्ड मार्टी या कंपनीचा बनावट ई मेल आयडी तयार करुन त्यांची ओळख चोरुन तो ईमेल केटीएम एस कंपनीचे कॅरोलिन यांना पाठविला.कॅरोलीन यांना त्या मेलमध्ये स्वत:चे बँक डिटेल पाठवून कॅरोलीन यांचा ई मेल क्रॅक केला.हा व्यवहार स्वत: जेरार्ड मार्टी यांचे सोबत असल्याचे पाठविले.कॅरोलीन यांचा ई मेल अनधिकृत रित्या वापरुन बनावट दस्त ऐवज तयार केला.जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर केटीएमएस कंपनीसोबत झालेल्या व्यवहाराची वेगवेगळ्या ७ ते ८ व्यवहार झाले.
 
कंपनीने जेरार्ड मार्टी यांच्या बँकेचा खातेक्रमांक समजून सायबर चोरट्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.असे ५ लाख ९७ हजार ७४ डॉलर इतकी रक्कम (४ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपये) सायबर चोरट्यांनी स्वत:च्या खात्यावर घेऊन कंपनीची फसवणूक केली.२६ मार्च ते ७ मे २०२१ दरम्यान हा व्यवहार झाला होता.आपली फसवणूक झाल्याचे आता कंपनीला समजल्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलीस निरीक्षक विजय पाटील (Police Inspector Vijay Patil) अधिक तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे दुस-या वर्षी बाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना