Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सिंबायोसिस’च्या विद्यार्थिनींना YCMH मध्ये मिळणार शवविच्छेदनाचे प्रशिक्षण

सिंबायोसिस’च्या विद्यार्थिनींना YCMH मध्ये मिळणार शवविच्छेदनाचे प्रशिक्षण
पुणे , शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (16:50 IST)
लवळे येथील सिंबायोसिस मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थिनींना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील शवविच्छेदनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति दिनी 150 रूपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे.
 
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्रातील शवविच्छेदनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण किंवा निरीक्षण करण्यास परवानगी मिळण्याबाबत लवळे येथील सिंबायोसिस मेडीकल कॉलेज फॉर वुमेन, सिंबायोसिस युनिर्व्हसिटी हॉस्पीटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी 8 फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्तांना अर्ज दिला होता.
 
महापालिकेतर्फे डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी 1 लाख 25 हजार रूपये अनामत रक्कम जमा करून घेऊन आणि प्रति विद्यार्थी प्रति दिनी 150 रूपये याप्रमाणे शुल्क आकारून शवविच्छेदनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येते.
 
त्याच धर्तीवर सिंबायोसिस मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थिंनींना महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात शवविच्छेदनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्षाकरिता 1 लाख 25 हजार रूपये अनामत रक्कम जमा करून घेण्यात येणार आहे.
 
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या 12 डिसेंबर 2017 रोजी शैक्षणिक प्रयोजनाकरिता देण्यात येणा-या रूग्णखाटांकरिता प्रति विद्यार्थी प्रति दिनी आकारण्यात येणारे सुधारीत शुल्क 150 रूपये आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजला यापूर्वी दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभुमीवर सिंबायोसिस मेडीकल कॉलेजच्या एमबीबीएसच्या विद्यार्थिंनींना वायसीएम रूग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात ‘मेडीको-लिगल अ‍ॅटोप्सी’चे प्रशिक्षण, निरीक्षण करण्यास मान्यता मिळण्याबाबत रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर केला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक ग्राउंड रिपोर्ट : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, 25 जणांचा मृत्यू, चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन