राज्य माध्यमिक आणि उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (ता.18) पासून सुरू होत आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहेत. दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यावर काही वेळातच पेपर सोशल मीडिावर व्हारल होतात. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्र आहेत.