Publish Date: Thu, 19 Feb 2026 (09:10 IST)
Updated Date: Thu, 19 Feb 2026 (09:23 IST)
पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हा महिना तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो.
उपवास आणि प्रार्थनांमुळे तुमचे नशीब उजळून निघो.
रमजान मुबारक!
या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा!
तुमची सर्व दुःखे दूर होवोत आणि
तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो.
रमजानचा पवित्र महिना
तुमच्या जीवनात प्रकाश आणि आनंद घेऊन येवो
सर्वांना रमजान मुबारक!
ज्याप्रमाणे चंद्राने आकाश उजळले आहे,
तसेच तुमच्या आयुष्यात आनंद उजळो
रमजान मुबारक!
रमजानच्या उपवासाने तुमचे शरीर आणि आत्म्याला शांती मिळो
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रमजानच्या शुभेच्छा!
रमजानच्या पवित्र महिन्याच्या
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
अल्ला तुमच्या सर्व प्रार्थना पूर्ण करो.
सबुरीचा आणि प्रार्थनेचा हा महिना
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो
रमजान मुबारक!
रमजानच्या या शुभ पर्वावर
तुमच्या घरावर अल्लाची असीम कृपा राहो
आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावो
इबादतीच्या या महिन्यात
तुमची सर्व दु:खं दूर व्हावीत
आणि यशाचे नवे मार्ग मोकळे व्हावेत
रमजानच्या खूप खूप शुभेच्छा!
रमजानचा चंद्र तुमच्या आयुष्यात
नवीन प्रकाश आणि उमेद घेऊन येवो
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला रमजान करीम!
मानवता आणि प्रेमाचा संदेश देणारा हा सण
तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करो
रमजान मुबारक!
अल्लाकडे हीच प्रार्थना आहे की,
या पवित्र महिन्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे
रमजानच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
रोजा, नमाज आणि कुराण पठणाच्या या काळात
तुमच्या मनाला शांती आणि आत्म्याला शुद्धता लाभो
रमजान मुबारक!
हा रमजान तुमच्यासाठी भरभराटीचा
आणि आरोग्यदायी ठरो, हीच सदिच्छा
रमजानच्या शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात अल्लाचा आशीर्वाद सदैव असावा
आणि प्रत्येक दिवस ईदीसारखा आनंदी असावा
webdunia
Publish Date: Thu, 19 Feb 2026 (09:10 IST)
Updated Date: Thu, 19 Feb 2026 (09:23 IST)