Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंघोळीसाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू

2 friends drowned while going for a bath अंघोळीसाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू Marathi Regional News In Webdunai Marathi
, रविवार, 20 मार्च 2022 (11:33 IST)
नागपुरातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात शिवा नदीच्या पात्रात धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळल्यावर अंघोळीसाठी गेलेले चार मित्रांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगेश यादवराव इंगळे(23), देवानंद विनोद पवार(22), असे या मृत्युमुखी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर अभिषेक प्रकाश गावंडे(22),प्रणय आखडे(34) यांचा जीव वाचला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाबाजारगावातील मंगेश इंगळे, अभिषेक गावंडे, देवानंद पवार, प्रणय आखाडे हे चौघे मित्र शिवा मार्गावरील ब्रह्मलीन तपकिरी महाराज मंदिर गोपाळपुरीच्या बोर नदीच्या पात्रात धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळून अंघोळीला गेले. पुलाखाली पाणी खोल होते आणि पाण्यात गाळ होता. पोहता येत नसल्याने देवानंद आणि मंगेश हे पाण्यात बुडाले.त्यांना बुडताना पाहून अभिषेक आणि प्रणय नदीच्या काठावर आले आणि त्यांनी आपल्या मित्रांना वाचविण्यासाठी मदतीला हाक मारली पण दुर्देवाने त्यांना  दोघांना वाचविण्यात अपयश आले. आणि मंगेश आणि देवानंदचा पाण्यात बुडून अंत झाला.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भविष्यात जम्मू काश्मीरमध्ये CRPF तैनात करण्याची आवश्यकता राहणार नाही - अमित शाह