मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यात मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे बाधित झालेल्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात येणार
मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा होणार
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती होणार
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ मिळणार
शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
मुचकुंदी लघू पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता