Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपुरात महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Nagpur police
, मंगळवार, 11 मार्च 2025 (21:43 IST)
नागपूर : शहरात राहणाऱ्या एका महिला काँग्रेस प्रदेश सचिवाने तिच्या मैत्रिणीला मुंबईहून नागपूरला बदली करून देण्याच्या नावाखाली ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिशा नावाच्या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, महिला राज्य काँग्रेसची सचिव असून त्या पीडितेला ओळखत होत्या. पीडित महिला आरोग्य विभागात परिचारिका असून तिच्या पतीचे 2017 मध्ये निधन झाले नंतर त्यांची बदली मुंबईला झाली. त्या नागपुरात बदली करवण्यासाठी प्रयत्न करत होती. मार्च 2024 मध्ये अनिशाला भेटायला पीडित महिला गेली आणि बदली करण्याबद्दल चर्चा केली. त्यावर अनिशाने तिला मी अनेकांची बदली केली असून माझी मंत्र्यालयात चांगली ओळख आहे आणि तिचे काम करण्यासाठी 3 लाख रुपयांचा खर्च येणार. विश्वास ठेऊन पीडितेने तिला 3 लाख रुपयेरोख  दिले. या व्यवहाराचे प्रतिज्ञापत्रही करण्यात आले.
त्यात म्हटले होते की अनिशाला ३ महिन्यांच्या आत काम पूर्ण करावे लागेल, अन्यथा सर्व पैसे परत मिळतील. दरम्यान लोकसभा निवडणुका आल्या आणि काम थांबले. अनिशा पीडितला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देत होती. तथापि, पीडितेची बदली होऊ शकली नाही. कामात होणारा विलंब पाहून पीडितने तिचे पैसे परत मागितले तेव्हा अनिशाने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला.
या वर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासांनंतर पोलिसांनी अनिशाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाविकास आघाडी कडून महायुती सरकारवर विश्वासघाताचा आरोप