Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरमसाठ बिलाने घेतला एकाचा जीव, केली आत्महत्या

huge bill
, सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (16:14 IST)
नागपुरात भरमसाठ बिलाने एका ५७ वर्षीय व्यक्तींचा जीव घेतला आहे. एका ५७ वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. लीलाधर लक्ष्मण गैधाने असं या व्यक्तीचं नाव आहे. ते नागपुरातील यशोधरा नगरमध्ये रहात होते. लीलाधर तळमजल्यावर तर भाडेकरू पहिल्या मजल्यावर राहतात. गेल्या आठवड्यात लीलाधर यांना तब्बल ४० हजार रुपयांचं वीज बिल आलं होतं. इतकं वीज बिल आल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासूनच लीलाधर मानसिक तणावाखाली होता.
 
४० हजार बिल बघून लीलाधर तणावाखाली होते. याच तणावात त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र,  तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. वीज बिल आल्यामुळे लीलाधर जास्त दारु प्राशन करु लागले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

127 वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड, दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय