Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत लोकल ट्रेन मध्ये दोन महिला टीसीच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला

two women TCs i
, सोमवार, 9 जानेवारी 2023 (23:37 IST)
मुंबईच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना एका तरुणीचा जीव धोक्यात आला तेवढ्यात लोकल ट्रेन मध्ये तिकीट तपासताना दोन महिला टीसी त्या डब्यात होत्या आणि त्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला ही घटना मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर धावत्या लोकल मध्ये शनिवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,घणसोली येथे एका कंपनीत काम करणारी 19 वर्षीय तरुणी लोकल मधून दुपारी दीड वाजता प्रवास करत होती. ती कर्जतला राहते आणि घरी जाण्यासाठी ठाण्याच्या लोकल मध्ये बसली. अचानक तिच्या छातीत दुखू लागले.महिलांच्या त्या डब्यात दोन महिला टीसी दीपा वैद्य आणि जैन मर्सिला या देखील डब्यातील महिला प्रवाशांकडे तिकीट तपासणी करत होत्या. तरुणीला होणाऱ्या त्रास बघून  दोघी तातडीने तिच्या कडे धावत गेल्या आणि ठाणे रेल्वे स्थानकात कळविले आणि त्यांना वैद्यकीय मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले. लोकल ठाणे पोहोचल्यावर तरुणीला तातडीनं रुग्णालयात नेले तिथे तिची प्रकृती अधिक गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले तरुणीला डॉक्टरांनी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगितलं तसेच तरुणीच्या कुटुंबियांना देखील कळविले. दोघी महिला टीसींनी प्रसंगावधान राखून तरुणीचे प्राण  वाचविल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले   
 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vistara:दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लँडिंग