आमच्या 50 जणांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
"मी अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलोय. त्यांना निर्णय घेण्यासाठी इतका उशीर का लागतोय, हे जाणून घेण्यासाठी मी दिल्लीत आलोय," असं सत्तार म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान केलं आहे. याविषयी बोलताना सत्तार म्हणाले, "31 तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे, मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे. त्यांचे आभार मानणार आहे.त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिल्लोड मतदारसंघात ठेवलेला आहे.
"माझं मन स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची परवानगी दिली, तर मी राजीनामा देणार आहे."
येत्या 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही ते म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे त्यांच्या दौऱ्यानिमित्त फिरत असताना, प्रत्येक सभेत बंडखोर आमदारांना आव्हान देत आहेत की, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला अब्दुल सत्तारांनी हे उत्तर दिलंय.