Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे 5 हून अधिक मंत्रिपदं

Webdunia
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (17:13 IST)
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे कोणती खाती?
 
राज्यात महत्त्वाचं मानलं जाणारं गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवलं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडची खाती :
 
सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडची खाती :
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
 
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत :
 
भाजपचे मंत्री :
1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
 
2) सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
 
3) चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
 
4) डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
 
5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
 
6) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
 
7) सुरेश खाडे- कामगार
 
8) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
 
9) अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
 
शिंदे गटाचे मंत्री :
1) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
 
2) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
 
3) संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
 
4) संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
 
5) उदय सामंत- उद्योग
 
6) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
 
7) अब्दुल सत्तार- कृषी
 
8) दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
 
9) शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments