रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पंधरपेशात वावरणाऱ्या बोठेने संगनमत करून अनेक गंभीर गुन्हे केले
असल्याने नियमानुसार त्याच्यावर मकोका कायद्यांव्ये कारवाई दाखल व्हावी अशी मागणी हत्या झालेल्या रेखा जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति पोलीस महासंचालक,
नाशिक उपमहारीक्षक आदींना पाठवण्यात आल्या असून त्यांनाही याबाबत कारवाई करण्याची विनंती जरे यांनी केली आहे.निवेदनात रुणाल जरे यांनी, आरोपी बाळ बोठे याचा गत दहा वर्षांचा इतिहास पाहता ,त्याच्या विरोधात हप्ता वसुली खंडणी वसुली,
अपहरण, सुपारी देणे, खून असे संघटित गुन्हेगारीचा लेखाजोखा मागावर असल्याचे म्हंटले आहे. आरोपीचा संघटित टोळ्यांशी संबंध असून मी काहीही करू शकतो बदली करू शकतो, न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करू शकतो अशी मजल गेली आहे.
आरोपीवर मोक्का नियमानुसार दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आणि प्रलंबित आहे, तसेच काही गुन्हे दमदाटी करून दाबले आहेत असा आरोप निवेदनात जरे यांनी केला आहे.आरोपी बोठे विरोधात सुपा,पारनेर,कोतवाली, तोफखाना, राहुरी असे म्हणतात
सहा गुन्हे दाखल आणि प्रक्रियेत असल्याचे जरे यांनी म्हणले आहे. आरोपीवर गंभीर गुन्हे असले तरी राजकीय वरदहस्त वापरल्याने त्याच्यावर गंभीर कारवाई झालेली नव्हती ती केली जावी असे एकंदरीत जरे यांनी निवदेनात केली आहे.