मुलीला कन्यादानानंतर सासरी पाठवणाऱ्या घरात शोकाचे वातावरण निर्माण झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या वाळूज महानगरात घडली आहे. साजापुरच्या तलावात मुलीच्या पित्याचा मृतदेह आढळल्याने सासर आणि माहेरी खळबळ उडाली आहे.
समीर चांदशाह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत समीर हे पत्नी शाहिनबी आणि मुलगा साहिल आणि मुलगी सानिया यांच्यासह साजापुरात वास्तव्यास होते. समीर हे मुळात चांदवड जिल्हा नाशिक चे असून साजापुरात कामानिमित्त आले आणि स्थायिक झाले. ते वाहन चालक असून पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचे. त्यांनी आपल्या मुलीचे सानियाचे लग्न समीर शेख या तरुणाशी 18 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात लावून दिले. नंतर मुलीच्या सासरी रिसेप्शन असल्यामुळे समीर चांद शाह कुटुंब मुलीच्या सासरी ढोरकीन ला रविवारी गेले. नंतर ते सर्व परत आले. लग्नाचा थकवा असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक हे झोपी गेले.
सकाळी उठल्यावर समीर चांद शाह हे घरात दिसले नाही. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर फोन लावला पण त्यांनी फोन बंद केला होता. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला. तरीही ते सापडले नाही. मंगळवारी साजापूरच्या तलावात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचे काही लोकांनी वाळूज पोलिसांना कळवले. नंतर अग्निशमन दलाने पाचारण करून मृतदेह तलावातून बाहेर काढले. नंतर त्याच्या जवळच्या कागदपत्रावरून ते मृतदेह समीर शाह चे असल्याचे समजले.
समीरच्या कुटुंबियांना हे समजतातच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सासर आणि माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे. समीरने असे का केले या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. वाळुंज पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंदवले असून पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.