Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्रीवर्धन किनार्‍यानंतर...हरिहरेश्वर किनारी सापडले चरस

श्रीवर्धन किनार्‍यानंतर...हरिहरेश्वर किनारी सापडले चरस
, मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (20:19 IST)
श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावर चरसची पाकीटे सापडल्यानंतर, दुसर्‍या दिवशी सोमवारी (29 ऑगस्ट) हरिहरेश्वर किनार्‍यावर चरसची 29 पाकीटे आढळून आल्याने श्रीवर्धनमध्ये खळबळ उडाली आहे. या पिशव्यांचे वजन 29 किलो व काही ग्रॅम असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. अशा प्रकारची आणखी पाकीटे मिळण्याची शक्यता असून, सदर पाकीटे कोणाला आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
 
रत्नागिरी समुद्रकिनारी चरसची पाकीटे सापडल्यानंतर रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी अशा प्रकारची पाकीटे किंवा इतर संशयास्पद वस्तू आहे का? याबाबत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मच्छीमार सोसायट्या आणि सागरी  सुरक्षा रक्षकांना सतर्क करण्यात आले होते. ही शोध मोहीम सुरू असताना रविवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावर येथे रत्नागिरी जिल्ह्यात सापडली तशाच प्रकारची 9 पाकिटे मिळून आली. त्यावर असे ‘अऋॠकअछ झठजऊणउढ लिहिलेले आहे.
 
प्रथमदर्शनी सदर पाकीटांमध्ये चरस हा पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. त्या सर्व पाकिटांचे वजन 10.380 किलो आहे.  त्याबाबत तालुका दंडाधिकार्‍यांसोर पंचनामा करुन श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅ3ट कलम 8(सी), 20(बी) (2)(सी), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी सोमवारी हरिहरेश्वर समुद्रकिनार्‍यावर अंमली पदाथारची पाकीटे सापडली आहेत.
 
हरिहरश्वर येथील सागरी सुरक्षा सदस्य रुपेश मयेकर हे सोमवारी (28 ऑगस्ट) सकाळी  8 वाजता समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारत होते. यावेळी त्यांना एक संशयास्पद पिशवी आढळून आली. याबाबतची माहिती त्यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिल्यानंतर श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे व उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर पिशवी समुद्राच्या पाण्याबरोबर  किनार्‍यालगत वाहून आली होती.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक जिल्ह्यातील वाढत्या लम्पी आजाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला "हा" महत्वाचा निर्णय