सध्या सर्वत्र पावसाळा सुरु आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोक वर्षाविहारसाठी जात आहे. पाण्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. लोक नदीपात्रात आणि धबधब्याच्या ठिकाणी गर्दी करत आहे. आणि पाण्यात फोटो काढत आहे. पण फोटो घेण्याच्या नादात जीव धोक्यात घालत आहे. अजिंठा लेणीच्या समोरील व्ह्यू पॉईंट धबधब्यात सेल्फी काढणे एका तरुणाला चांगलंच भोवलं आहे.
सेल्फीच्या नादात हा तरुण पाय घसरून थेट दोन हजार फूट खोल कुंडात पडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण रा. नांदतांडा ता. सोयगाव .असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जळगाव जिल्ह्यातील चार मित्रांना घेऊन अजंठाच्या लेणी बघायला गेला होता. त्यांनतर ते सर्व जण सप्त कुंड धबधब्यावर सेल्फी काढण्यासाठी पोहोचले. सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो 2000 फूट खोल कुंडात पडला. त्याला पोहता येत नसल्याने कसा बसा तो कुंडाच्या कपारीचा आणि दगडाच्या आधाराने जीव वाचवत होता.
घटनेची माहिती मिळतातच पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बचाव पथकाने त्याचे प्राण वाचवले.