Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता ताई,“मानसिक स्वास्थ जपा”, शिवसेनेचा टोला

Webdunia
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:11 IST)
शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवर अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत “मानसिक स्वास्थ जपा”, असा टोला लगावला आहे. याआधी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.   
 
“अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. मनस्वास्थ चांगले राहते”, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.
 
“शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर मृता राहील. शिवसेनेची काळजी करु नका. आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे अयोग्य बरे का”, असा चिमटा नीलम यांनी काढला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: शिर्डी साई संस्थान मंदिरावर बॉम्ब टाकण्याची धमकी

गोवा मंदिरात चेंगराचेंगरी, राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

शिर्डी साई संस्थान मंदिरावर बॉम्ब टाकण्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरु

बेंगळुरू-पुणे महामार्गावर मर्सिडीज कार मोटारसायकलला धडक देऊन पुलावरून कोसळली,एकाचा मृत्यू,तिघे जखमी

RCB vs CSK: आयपीएल 2025 चा 52 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी बेंगळुरू येथे होणार

पुढील लेख
Show comments