Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंबाबाई मंदिर परिसरात उत्खनन, तब्बल 457 पुरातन वस्तू सापडल्या

ancient treasure
, बुधवार, 10 मार्च 2021 (08:06 IST)
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननात तब्बल 457 पुरातन वस्तू सापडल्या आहेत. यानिमित्तानं प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणाच समोर आल्यात. दुसरीकडं अंबाबाई मंदिर आणि परिसराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतला आहे.
 
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाचं सध्या उत्खनन सुरू आहे. त्यात जुन्या मूर्ती-वीरगळ, अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस,१३५ दुर्मीळ नाणी, प्राचीन मूर्ती, काचेच्या वस्तू असा पुरातन खजिनाच सापडला आहे. मनकर्णिका कुंडातून काढलेल्या गाळात पुरातन ऐतिहासिक वारसा सापडला आहे.
 
अंबाबाई मंदिर परिसरात घाटी दरवाजा लगत हे मनकर्णिका कुंड आहे. 1957 मध्ये ही जागा सार्वजनिक बागेसाठी महापालिकेला देण्यात आली. 2020 मध्ये ती जागा देवस्थानच्या ताब्यात आली. देवस्थाननं मनकर्णिका कुंड बाहेर काढण्यासाठी उत्खनन सुरू केलं. या उत्खननातून आणखी अनेक बाबी समोर येतील, असा विश्वास मंदिर अभ्यासकांना आहे. लवकरच हा खजिना भाविकांना देखील पाहता येणार आहे. दरम्यान, हेमाडपंथी बांधकाम शैली असलेल्या या प्राचीन करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईसह राज्यात अधिक उकाडा जाणवणार