Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमपीएससीचा संतापजनक कारभार; मृत्यूनंतरही स्वप्नील लोणकरची क्रूर थट्टा

Annoying management
पुणे , बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:25 IST)
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली होती. २९ जून रोजी स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेला आता ६ महिने उलटल्यानंतर एमपीएससीच्या कारभाराचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत आता स्वप्नीलचं नाव आलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Service) २०१९ च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचं नाव आलं आहे. या प्रकारामुळे स्वप्नीलचे कुटुंबीय आणि एमपीएससी विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्ती केला जात आहे.
 
माझ्याकडे एमपीएससी आयोगाचं माझ्याकडे पत्र आहे. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची माहिती असतानाही एमपीएससी मुलाखतीसाठी तारीख जाहीर करत आहे. याचा अर्थ तो कच्चा नव्हता, तो हुशार होता. एक हजार एक टक्का एमपीएससीने माझ्या मुलाचा बळी घेतला आहे. इतकंच नाही तर एमपीएससी आमच्या लोणकर कुटुंबियांच्या जमखेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
 
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विना मास्क फिरणाऱ्या भाजप आमदाराला मंत्रालय परिसरात दंड