Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे गटाच्या आणखी एक आमदार शिंदे गटाच्या मार्गावर?

Webdunia
रविवार, 18 जून 2023 (13:13 IST)
शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याच शक्यता आहे. मनिषा कायंदे या शिवसेनेच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत.
 
2012 साली डॉ. कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला. आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करतायेत, असं बोललं जात आहे.
 
2018 साली जेव्हा शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरीही ठाकरे निर्णयावर ठाम राहत त्यांनी कायदेंना विधान परिषदेत पाठवलं होतं.
 
मुंबईत आज (18 जून) उद्धव ठाकरे यांच्या गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. राज्यातील जवळपास चार हजार पदाधिकारी आणि नेते या शिबिराला उपस्थित आहेत. या शिबिरातही मनिषा कायंदे हजर नाहीत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या वृत्तांनी जोर धरला आहे.
 
दुसरीकडे, मनिषा कायंदे या नॉट रिचेबल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेत्यांकडून कायंदेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. पण आता शिंदे गटात त्या प्रवेश करत असल्याचं कळताच, ठाकरे गटातील नेत्यांनीही कायंदेंवर टीका सुरू केली आहे.
 
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनिषा कायंदेंवर टीका केली.
 
एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या की, “त्या फिरता चषक आहेत. त्या इकडून-तिकडे फिरतच असतात. आमचा पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच चालतो.”
 
स्वत: मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेशाबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नसला, तरी ठाकरे गटातील नेत्यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सत्तेसाठी काही जण जात आहेत, असं ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे.
 
बीबीसी मराठीने दोन ते तीनवेळा मनिषा कायंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीय.
 
दरम्यान, आज (18 जून) उद्धव ठाकरे यांचं संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राज्यव्यापी शिबिरात भाषण होणार आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मनिषा कायंदेंवर काही बोलतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
माजी आमदार शिशिर शिंदेंचाही राजीनामा
कालच (17 जून) शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. चार वर्षांपूर्वी शिशिर शिंदे मनसेतून शिवसेनेत परतले होते. मनसेत असताना ते एकदा आमदार म्हणूनही निवडून आले होते.
 
मात्र, गेल्या चार वर्षात शिवसेनेत कुठलीही जबाबदारी दिली नसल्यानं ही आयुष्यताली वर्षे फुकट गेल्याची खंत व्यक्त करत शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिलाय.
 




Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments