Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अशाेकस्तंभ परिसरात उभारण्यात आला तब्बल 61 फूट उंच, 22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा‎

shivaji maharaj
नाशिक , शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (20:45 IST)
सलग‎ 12 दिवसांच्या अताेनात मेहनतीतून नाशिकमधील अशाेकस्तंभ परिसरात 61 फूट उंच, 22 फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा‎ उभारण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे, सर्वच ठिकाणी जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा अशोक स्तंभ मित्र मंडळ, अनोखा विक्रम करणार आहे.
या मंडळाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ चौकात तब्बल 61 फूट उंच शिवरायांची मूर्ती साकारली आहे, 22 फूट रुंद असलेल्या या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल आहे. ही भव्य दिव्य मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
 
नाशिकच्या पाटोळे बंधूंनी साकारली भव्य दिव्य मूर्ती
शिवजयंती निमित्त त्र्यंबकेश्वर रोडवरील एच.पी. ब्रदर्स आर्ट्सचे हितेश व हेमंत पाटोळे यांनी ही मूर्ती तयार केली आहे. मूर्ती बनवण्यासाठी एफआरपी फायबर प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. तसेच, आतील साचा स्टीलपासून बनवण्यात आला आहे. पुतळा साकारण्यासाठी तब्बल चार टन एफआरपी फायबर तर, चार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
 
शिवरायांची भव्य दिव्य मूर्ती साकारण्याच स्वप्न झालं पूर्ण
नाशिक शहर तसेच जिल्ह्यात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध मंडळ, वेगवेगळे देखावे सादर करत असतात. मात्र अशोक स्तंभ मित्र मंडळ दरवर्षी अनोखा देखावा साकारत असतं गेल्या दहा वर्षांपासून त्यांचं स्वप्न होतं की शिवरायांची मूर्ती ही भव्य दिव्य साकारायची आणि यावर्षी अखेर 61 फूट उंच शिवरायांची मूर्ती साकारली आहे. आत्तापर्यंत शिवजयंतीला देशभरात कोणीही इतकी मोठी शिवरायांची मूर्ती साकारली नसल्याचा दावा अशोक स्तंभ मित्र मंडळांनी केला आहे त्यामुळे आमचे मित्र मंडळ यंदा वर्ल्ड रेकॉर्ड करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अशी प्रतिक्रिया अशोक स्तंभ मित्र मंडळाचे अध्यक्ष अमित व्यवहारे यांनी दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हृदयद्रावक; मित्रांना वाचवायला गेला अन् तोही बुडाला, तीन तरुणांचा मृत्यू