suvichar

सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला चक्क टॉयलेटमध्ये लाच घेताना अटक

Webdunia
बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:28 IST)
नाशिक आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्याला टॉयलेटमध्ये दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज  रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप नागनाथराव वडजे असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील आदिवासी विकास विभाग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय नाशिकला असून सध्या हा विभाग लाचखोरीमुळे विशेष चर्चेत आला आहे. याच विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल हे तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले विभागातील कळवण विभागाचा सहाय्यक अधिकारी आहेत.
ही घटना ताजी असतानाच आता याच विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वडजे जाळ्यात सापडले आहे. या अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये १० हजारांची लाच घेतली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. वडजे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे रोजंदारी वरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. ते कामाठी किवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात त्यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि ते आज एसीबीच्या हाती लागले. याप्रकरणी एसीबीने अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे, कळवण येथील उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती जाधव, राजेश गिते,  शरद हेंबाडे, पोलीस कर्मचारी संतोष गांगुर्डे व अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

२०३० पर्यंत महाराष्ट्राला क्रमांक १ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आढावा

LIVE: महाराष्ट्रातील एमबीबीएस डॉक्टरांची ग्रामीण सेवा बंधनांतून मुक्तता

महाराष्ट्रातील सर्व शाळांना तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश

सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले, सरकारने तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या

मुंबईत अनियंत्रित बेस्ट बसची डिव्हायडरला धडक, ६ प्रवासी जखमी, चौकशीचे आदेश

पुढील लेख
Show comments