Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर बलात्कार, उपसभापतींनी कडक शिक्षेचे निर्देश दिले

nilam gorhe
, सोमवार, 10 मार्च 2025 (15:20 IST)
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर असते. जनतेचे संरक्षणाचे काम पोलिसांवर असते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थाची जबाबदारी  असलेल्या पोलीस  कर्मचाऱ्यानेच एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणामुळे कायदा आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
बीड जिल्ह्यात एका पोलीस  कर्मचाऱ्याने  महिलेला महिलादिना निमित्त कार्यक्रम असल्याचे सांगून तिला बोलावून तिचावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना महिला दिनी घडली आहे. 

पीडित महिला गेवराई तालुक्यातील आहे. ती पुण्यातून पाटोद्यात आली असून पोलीस कर्मचाऱ्याने तिला फोनवर कार्यक्रमासाठी ये असे सांगून बोलावून घेतले.तिला दुचाकीवर बसवून एका घरात नेण्यात आले तिथे गेल्यावर पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत गैरवर्तन  करण्यास सुरु केले. तिने आरडाओरड केल्यावर त्याने तिला चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तिने पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानेच केलेले हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी. 

 नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीची दखल घेत, वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करावी आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी सांगितले.
पीडितेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती मदत आणि सुरक्षा देण्याचे निर्देश देताना, त्यांनी सांगितले की अशा घटनांसाठी संपूर्ण पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करावी.

या घटनेतील आरोपीला त्वरित शिक्षा मिळावी म्हणून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनीं दिले आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: अजित पवार म्हणाले २४ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य