Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhiwandi : भिवंडीत झोपेतच कुटुंबावर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2023 (11:38 IST)
भिवंडी शहरात काही इमारती धोकादायक झाल्याचा प्रश्न गंभीर होत आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीत अनेक धोकादायक इमारती आहेत. या इमारतीमध्ये आजही अनेक नागरिक जीव मुठीत घेऊन राहण्यास आहेत. महापालिकेने अशा इमारतीना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आले असून देखील नागरिक तिथे राहत आहे.

अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता असून गाढ झोपेत असताना एका कुटुंबावर काळाने झडप घातली असून भिवंडीत गौरीपाडा धोबी टाळावा येथील साहिल हॉटेलच्या परिसरात अब्दुल बारी जनाब इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी आहे.

या इमारतीचा स्लॅब कोसळला त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण ढिगाऱ्यात दाबले गेले. अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन 7 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.  

ही इमारत 40 वर्षीय जुनी असून धोकादायक आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना असून या इमारतीसाठी पालिकेने नोटीस बजावली होती. शनिवारी  मध्यरात्री दोन मजली इमारतीचा मागील भाग कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्यात सहा जण अडकले असून दोघांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले

घटनेची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी धाव घेत तातडीनं बचाव कार्य सुरु केले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ चे जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरु केले.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.    
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments