आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार मिळावेत, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास परवानगी दिलेली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईमध्ये अनिल देशमुख यांन ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर करावा, यासाठी अनिल देशमुख प्रयत्न करत आहेत. १०० कोटी रुपये वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. यामध्येच त्यांचे गृहमंत्रीपद गेले होते. ईडीने या प्रकरणामध्ये ईसीआयआर दाखल केला होता. या प्रकरणात वर्षभर ते आर्थर रोड तुरुंगात होते.
Edited By - Ratandeep Ranshoor