Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनावरुन भाजप पुन्हा आक्रमक, केले सरकारवर आरोप

BJP attacks
, बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (18:47 IST)
राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.  
 
दरम्यान, राज्यात ४२ टक्के चाचण्या वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे सांगत मुंबईत चाचण्या वाढवा अशा आशयाचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यात राज्यातील चाचण्यांची टक्केवारी आणि मुंबईतील चाचण्यांची टक्केवारी नमुद करण्यात आली आहे.
 
देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टीव्ही रिपोर्टरच्या निधनानंतर राजेश टोपे यांचा मोठा निर्णय