पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सुद्धा भर पडली आहे . त्यांनी आपल्या ट्विटर वरून भाजपाला खोचक सल्ला दिला आहे. त्यांनी असे ट्विट केले, ” भाजपच्या पुणे,नागपूर बुरूजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला आहे. आतातरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोध पक्ष म्हणून काम करावं.” असे त्यांनी ट्विट केले.
राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीला एकजुटीने विजय मिळाल्याचे दिसत आहे. मात्र,भाजपाला एका जागेवर यश मिळाले असून त्यांचा पुणे आणि नागपूर हे त्यांचा बालेकिल्ला असून तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय झाले आहेत. रोहित पवार यांनी विजय उमेदवाराचं अभिनंदन करणारं ट्विट करून त्यामध्ये भाजपावर सुद्धा टीका केलीय.
“भाजपमध्ये हि निवडणुक प्रतिष्ठेची असली तर महाविकास आघाडीची निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेसह सहयोगी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकाबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आलं. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे .” असला टोला त्यांनी यावेळी लावला.