Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आगामी सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार; भाजपाच्या बैठकीत आवाहन

BJP will contest all upcoming elections on its own; Appeal to BJP meeting Maharashtra News Regional Marathi  News
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)
जळगाव  आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन बोदवड येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी पक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा व समर्पण’ अभियानाचा आढावा घेण्यात आला.
 
भारतीय जनता पार्टीची बोदवड तालुक्याची ‘विस्तृत आढावा बैठक’ मंगळवार दि.५ रोजी माजी मंत्री आ.गिरिष महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी निवडणूक यासारख्या विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2021: विराट कोहलीने प्ले-ऑफमध्ये पोहोचल्यानंतर सांगितले,-पहिल्या दोनमध्ये राहण्यासाठी सुधारणा करावी लागेल