Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट मुंबई पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क

big accident outside Matoshree's residence
, मंगळवार, 16 जानेवारी 2024 (10:00 IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या …मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती आहे. चार-पाच मुस्लीम व्यक्तींचे संभाषण कानावर पडले.त्यात आपण ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचे ऐकल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.त्याने नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली.संबंधित मुस्लीम तरुण उर्दू भाषेतून हे संभाषण करत असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला.

इतकेच नाही, तर संबंधित तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्याने घेणार असल्याचा दावाही त्याने नियंत्रण कक्षाला केलेल्या फोनवर केला.या माहितीनंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर मातोश्रीबाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.यावरून संजय राऊत म्हणाले की, मातोश्रीवर कांड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे

तर त्याविरोधात कारवाई करायला पाहिजे. आम्ही सातत्याने सांंगतोय की, ज्याप्रमाणे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे हे कोणतं राजकारण आहे? आम्ही त्याला घाबरणारे नाहीत. शिवसेना आणि शिवसैनिक ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सतत तयार आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव