Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणताही मंत्री तुम्ही रेल्वेच्या फलाटावर बसून काम करताना पहिला आहे का

chandrakant-patil-on-cst-railway-station
, सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:09 IST)

तुम्ही कधी एखदा मंत्री रेल्वे फलाटावर बसून काम करतांना पाहिला आहे का ? नाही ना ? मात्र असा मंत्री आहे ज्यांनी अशी कोणतीही भीड अथवा शरम न करता काम केले आहे. मात्र राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मंत्री रेल्वेच्या फलाटावर बसून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काम केले आहे. यामध्ये चंद्रकांतदादा  पाटील यांचा साधेपणा सर्वाना ठावूक आहे.  त्याची प्रचिती मुंबई आणि सोशल मीडियामुळे अनेकांना पाहता आली आहे. मंत्री महोदय चंद्रकांतदादा मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. मात्र याचवेळी  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अधिकारी फार अर्जंट  काम घेऊन आला होता. एका महत्त्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटलांची सही हवी होती. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर सही कशी घ्यायची असा संभ्रम झाला होता. मात्र साधे सुधे  चंद्रकांत पाटलांनी कोणताही बडेजाव न करता, प्लॅटफॉर्मवर पडलेल्या गाठोड्यावर बसून, सर्व पेपर वाचून काढले आहेत. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तिथेच सह्या केल्या आहेत. मग ते  कोल्हापूरसाठी रवाना झाले.चंद्रकांत पाटलांचा हा साधेपणा पाहून सर्वच जण अवाक् झाले आहेत. पहिला मंत्री असेल ज्याने अश्या प्रकारे आपले काम पूर्ण केले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला जज ची मुजोरी उचलला पोलिसावर हात