Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्वांसाठी पुन्हा खुला, आता महिलांनाही परवानगी

Webdunia
रविवार, 19 जून 2022 (12:20 IST)
शनीशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. 18 जूनपासून भाविकांना या चौथथऱ्यावरून तेल अभिषेक करता येणार आहे. शिवाय आता महिलांना प्रथमच तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 
 
गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही मागणी होती यानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्तने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मधल्या काळात सुरक्षेच्या काणास्तवर चौथरा सर्वांसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही वर्ष महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली होती. या वर 2015 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते.त्यानंतर महिलांना केवळ पादुकांपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आता सर्वांसाठी शनी चौथरा उघडण्यात आला असून आता महिलांना देखील तेलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
 
ज्या भाविकांना शनी देवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयांची देणगी पावती घ्यायची आहे. तेल अभिषेक पावतीसाठी भाविकांनी देवस्थानचे तेल विक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.
 
राज्यासह, देशभरातील अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर शनी भक्तांच्या मागणीचा विचार करून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments