Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Chikungunya crisis in Maharashtra : महाराष्ट्रावर आता चिकनगुनियाचे नवे संकट

Chikungunya crisis in Maharashtra : महाराष्ट्रावर आता चिकनगुनियाचे नवे संकट
, रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (15:54 IST)
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने उच्छाद मांडला होता. कोरोनामुळे बऱ्याच जणांनी आपले प्राण गमावले होते. आता कोरोनाचा वेग मंदावला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन लावण्यात आले होते. माणसाचे धावणारे आयुष्य मंदावले गेले. आता कोरोनाचा प्रसार आणि प्रभाव कमी झाल्याने आयुष्य पुन्हा वेगाने सुरु झाले आहे. आता या संकटानंतर महाराष्ट्रात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे प्रकरणे वाढत आहे. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत राज्यात या वर्षी चिकनगुनियाचे प्रकरण  वाढत आहे. ऑक्टोबर मध्ये चिकनगुनियाचे 2000 हुन अधिक रुग्ण आढळले आहे.  चिकन गुनिया आणि डेंग्यू हे एकच डास एडिस इजिप्ती मादी डास ने चावल्याने होतो. हा आजार वेगाने प्रसरतो. चिकनगुनिया हा डासामुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेत आढळणारा आजार असून हा धोकादायक आहे. हा आजार एका संक्रमित व्यक्तीला चावल्यावर दुसऱ्या व्यक्तीला चावल्याने दुसऱ्या कडे वेगाने पसरतो. या आजाराची लक्षणे साधारणपणे 4 ते 6 दिवस दिसून येत नाही. हे डास दिवसात आणि दुपारच्या वेळी चावतात.  राज्यातील पुणे ,नाशिक कोल्हापुरात  या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वातावरण आणि बदलत्या राहणीमानामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे प्रमाण वाढत आहे. या डासाची अंडी पाण्याशिवाय देखील वर्षभर टिकून राहतात पाण्यात यांची संख्या झपाट्याने वाढते. 
लक्षणे -
1 या आजारात सांधे दुखतात 
2 हाडांमध्ये वेदना होणं 
3 स्नायू दुखणे
4 डोकेदुखी 
5 नौशीया
6 थकवा जाणवणे
7 अंगावर पुरळ येणे 
या आजारात मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. या मध्ये ताप आल्यावर स्नायूत वेदना जाणवते आणि सांधेदुखीचा प्रचंड त्रास होतो. वेळीच निदान करून यावर उपचार घेणे योग्य ठरते. या आजाराचे निदान अनेकवेळा चाचण्यांमधून केल्यावर देखील निदान होत नाही. घराच्या अवती भोवती पाण्याचा साठा होऊ देऊ नका. फवारणी करा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, चोरटयांनी परळीतून 124 गाढवं चोरी नेले, बीडच्या परळीतील विचित्र घटना