उर्फी जावेद प्रकरण आता चिघळले असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे. महिला आयोगाने म्हळॆ आयोगाच्या अपमान केल्या प्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांनी महिला आयोग उर्फी जावेदच्या प्रकरणात दुट्टप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. या वरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली त्यावरून उत्तर देत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचावर हल्ला बोल केला आहे. त्या म्हणाल्या "स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसत आहे.याचे मनात वाईट वाटते. अशा 56 नोटीस आल्या आहे त्यात अजून एकाची भर " असे म्हणत हल्ला बोल केला आहे.
उर्फी जावेद जी सार्वजनिकरित्या नंगानाच करत सर्वत्र फिरत आहे तिला नोटीस देण्या ऐवजी तिचा नंगानाच खपवणार नाही. असा विरोध करण्याऱ्याला पाठविली. माझी लढाई स्त्रियांच्या अस्मितेसाठी आणि त्यांचा सन्मानासाठी आहे. ती लढाई सुरूच राहणार. असे म्हणत हल्ला बोल केला आहे.