Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये खडाजंगी

devendra fadnavis
, सोमवार, 20 जानेवारी 2025 (17:37 IST)
राज्य सरकारने शनिवारी 36 जिल्ह्यांसाठी प्रभारी मंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली. या घोषणेनंतर महायुतीतील गटबाजी वाढली. निवडणुकीच्या घोषणेनंतर सुरू झालेले शीतयुद्ध आता उघडपणे समोर आले आहे.
पालक मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या अदिति तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे तर गिरीश महाजन यांना नशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. या वर शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी अदिति तटकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना दिल्याने शिवसेना नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले नाराज आहेत. गोगावले हे रायगड जिल्ह्यातील आहेत. रायगडचे पालकमंत्री होण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते.
 
तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते दादा भूसे यांनी देखील गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री जाहीर केल्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. नाशिकमधील शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे हेही आपल्या गृहजिल्ह्य़ाचे पालकमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले. याचा राग दादा भुसे यांनाही होता.
तर पक्षाला कोणत्याही पदाची गरज नसल्याचा दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी केला. बोरस्ते म्हणाले की, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना स्वतःचा पालकमंत्री हवा आहे.

आता या कारणावरुन वाढत्या विवादाला बघता महायुती सरकार ने पालक मंत्र्यांच्या घोषणेनंतर एका दिवसांतच नाशिक रायगड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तिला थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता महायुती सरकारमध्ये मतभेद होण्याची परिस्थिति निर्माण झाली आहे. 
राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने होणा-या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोस येथे उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले.
राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये खडाजंगी बघून या वर आता मुख्यमंत्री फडणवीस  अंतिम निर्णय घेतील.
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओह्ह ! भिकाऱ्याने खरेदी केला दीड लाखांचा फोन, हातात IPhone 16 Pro Max पाहून लोक थक्क