Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची एनसीसीकडून स्वच्छता

Webdunia
शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (22:02 IST)
मुंबई, : गेले १० दिवस गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. तर अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील प्रमुख चौपाटींवर भक्तांची असंख्य गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होत्या. अशात चौपाटीवर निर्माल्य आणि इतर कचऱ्याचा प्रश्न दर वर्षी निर्माण होतो. त्यामुळे गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता एनसीसी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
 
यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व एनसीसीमधील ५०० मुले व मुली आणि अधिकारी अनेक सभासद सहभागी झाले होते. गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी २०० गोण्या निर्माल्य आणि इतर कचरा काढण्यात आला.
 
या कार्यक्रमाला ब्रिगेडीअर विक्रांत कुलकर्णी आणि माधवाल, कमांडर सतपाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण मैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन एनसीसीच्या वतीने करण्यात येत असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments