अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे. या वर आळा घालण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा 18 वर्षे ऐवजी 14 वर्षे करण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे. अशी माहिती अजित पवारांनी दिली.
ते म्हणाले, बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा 18 वर्षे आहे. मात्र अलीकडेच 13 ,14 वर्षांच्या मुलांमध्ये देखील गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे. मुले गुन्हेगारीकडे वळत आहे.या मुलांकडून त्यांची दिशाभूल करुन को ते गुन्हे करवले जातात. त्यांच्या हातून गुन्हे घडल्यानंतर देखील अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कड़क कारवाई करता येत नाही. किवा त्यांना कारागृहात देखील पाठवता येत नाही. त्यांना वयोमर्यादेमुळे बालसुधारगृहात ठेवावे लागते.
त्यामुळे ही वयोमर्यादा कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे.14 वर्षाचा अल्पवयीन मुलगा देखील गुन्ह्यात सहभागी असेल तर कायद्यामध्ये बदल करूं अल्पवयीन मुलांना देखील कड़क शिक्षा कशी होईल या साठी प्रयत्न केले जातील.असे त्यांनी सांगितले.