Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीडमध्ये कोरोनास्थिती गंभीर, एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

Corona condition critical in Beed
, बुधवार, 7 एप्रिल 2021 (16:25 IST)
औरंगाबाद- महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. येथे कोव्हिड-19 मुळे मृत्यू पावणाऱ्या आठ लोकांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या आठही रुग्णांना एकाच चितेवर ठेवून चितेला अग्नी देण्यात आला. या संबंधात एका अधिकार्‍याने म्हटले की तात्पुरत्या स्मशानभूमीत जागेअभावी हे केले गेले.
 
ते म्हणाले की अंबाजोगाई नगर येथील स्मशानभूमीत संबंधित लोकांच्या अंत्यसंस्कारास स्थानिक लोकांनी विरोध दर्शविला होता, म्हणून, स्थानिक अधिका्यांना अंत्यसंस्कारासाठी आणखी एक जागा शोधावी लागली जिथे जागा कमी होती.
 
अंबाजोगई नगर परिषद प्रमुख अशोक साबले यांनी सांगितले की आमच्याकडे सध्या असलेले स्मशानभूमीत संबंधित मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला म्हणून आम्हाला शहरापासून दोन किलोमीटर लांब मांडवा मार्ग येथे जागा शोधावी लागली. ते म्हणाले की या नवीन तात्पुरत्या अंत्यसंस्कार घरात जागेचा तुटवडा आहे.
 
अधिकार्‍याने सांगितले की यासाठी मंगळवारी एक मोठी चिता तयार करण्यात आली आणि आठ जणांवर अंत्यसंस्कार केले गेले. ही एक मोठी चिता होती आणि मृतदेह एकमेकांपासून एका विशिष्ट अंतरावर ठेवण्यात आले होते.
 
ते म्हणाले की कोरोना विषाणूची लागण वेगाने होत आहे आणि यामुळे मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे, म्हणून अस्थायी शवदाह गृह विस्तारित करणष आणि मान्सून सुरु होण्यापूर्वी याला वॉटरप्रूफ तयार करण्याची योजना तयार केली जात आहे.
 
बीड जिल्ह्यात मंगळवारी संसर्गाचे 716 नवीन रुग्ण आढळले. जेथे आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण घटनांची संख्या 28,491 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 672 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एखाद्या मुलाचा विमानात जन्म झाला असेल तर ते जेथे लँड करेल, त्याच शहरास जन्म स्थान समजले जाईल, जाणून घ्या प्रमाणपत्र कसे तयार केले जाईल?