Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकच्या खासदार भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोरोना

Corona to Nashik MP Bharti Pawar and MP Hemant Godseनाशिकच्या दोन्ही खासदारांना कोरोना Marathi Regional News In Webdunia Marathi
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:50 IST)
नाशिक जिल्ह्यातील खासदार भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. भारती पवार ह्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील आहे तर हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदार संघातील आहेत.
 
चार दिवसापूर्वी भारती पवार यांनी मुंबईत महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. पत्रकार परिषदेत मुंबईत त्यांनी राज्यातील परिस्थितीचे विश्लेषण केले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी नशिक मधील अनेक कार्यक्रमाना त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. 
 
डॉ. भारती पवार खासदार आणि राज्य आरोग्य मंत्री ह्या गेल्या काही दिवसा पासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी अनेक जिल्ह्यात जाऊन कोरोनाची आढावा बैठक घेतली होती. लसीकरणा बाबत जनजागृतीसाठी ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम घेतले. दोन दिवसापूर्वी १५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी ला त्यांचा मुंबई दौरा होता. या दौऱ्याला नाशिकहून मुंबई ला जात असताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचा संशय आल्याने  त्यांनी ताबडतोब तपासणी करून घेतली.
तर खासदार हेमंत गोडसे यांचा ही कोरोना अहवाल बुधवारी ५ जानेवारी ला पॉझीटीव्ह आला आहे. गोडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. दोन दिवसापूर्वी नाशिक मधील केंद्रीय रुग्णालयाचे आणि १५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते एकत्र होते.
बुधवारी अहवाल पॉझीटीव्ह आल्या नंतर दोघांनीही ट्विटर द्वारे माहिती दिली असून  संपर्कात आलेल्यां व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 7 गडी राखून विजय ,जोहान्सबर्गमध्ये भारताचा पहिला पराभव