Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत

Covid Care Centers should be set up in Ahmednagar taluka
, मंगळवार, 18 जानेवारी 2022 (22:02 IST)
दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली‌. त्यावेळी ते बोलत होते.
 
श्री. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील कोवीड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढविली पाहिजे‌. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. तेव्हा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. अशा सूचना ही श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या. यावेळी श्री‌. सांगळे म्हणाले, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे‌. यासाठी कोवीड नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर द्यावा. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे आदी अधिकारी अहमदनगर येथून उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित पवार म्हणाले पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवणे चुकीचे !