Dharma Sangrah

पालकांनो काळजी घ्या लहान मुलाचा घरातील झोक्याल अडकून मृत्यू

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:05 IST)

घरातील लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोक्याचा फास लागून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथील सारस्ते गावात ही घटना घडली आहे.

दुपारी दोनच्या सुमारास रविवारी ४ मार्च रोजी उमेश मनोहर कुवर (वय १२, रा. सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) हा घरात बांधलेल्या झोक्यासोबत खेळत होता. मात्र खेळताना त्याला गळ्याला अचानक फास बसला त्यात तो शुद्ध हरपून जखमी झाला होता. ही बाब लक्षात  येताच उमेशला त्याचा चुलत भाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात पावणेचार वाजेच्या सुमारास दाखल केले होते.

मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गडेसर यांनी उमेशला तपासले मात्र त्याने  प्रतिसाद न मिळाल्याने त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या आगोदर पालकांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील सिडको परिसरातील लहान मुलाने १० रुपयांचे नाणे गिळले होते त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील राज्य परिवहन एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठी भेट! पगार आणि भत्त्यांमध्ये भरीव वाढ जाहीर

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४४ पोलीस कर्मचारी तैनात करून मोहरम शांततेत साजरा करण्याची तयारी सुरू

उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य कमकुवत असल्याचा रामदास आठवले यांचा दावा

आधी हत्या, मग सोशल मीडियावर भावूक पोस्ट... केतन अग्रवाल प्रकरणात त्याची होणारी पत्नी सियाची जुनी पोस्ट व्हायरल

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी येथील भुयारी मार्ग बंद, पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

पुढील लेख
Show comments