Festival Posters

म्हणून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

Webdunia
गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:27 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
 
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री  शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात सपत्नीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राष्ट्रध्वजाला सलाम करत आहेत. पण, रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे असे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. 
 
रश्मी ठाकरे यांनी  ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
Photo: Twitter

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

मातोश्रीत बैठकीला पाच खासदार गैरहजर, उद्धव ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला

नागपूरमध्ये महागाईविरोधात शरद पवार यांच्या गटाने 'थाळी बजाओ' आंदोलन सुरू केले

IND A vs SL A: भारत 'अ' संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत, श्रीलंका 'अ' संघाचा २६५ धावांनी विजय

नागपूरात विवाहित महिलेला मादक पदार्थ देऊन तिच्यावर वर्गमित्राने बलात्कार केला

LIVE: रोहित पवार यांचे उपोषण संपले

पुढील लेख
Show comments