Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकात महिला वैद्यकीय अधिकारीचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळला

The body of a female medical officer was found in a burnt car in Nashik नाशिकात महिला वैद्यकीय अधिकारीचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळला   Marathi Regional News
, बुधवार, 26 जानेवारी 2022 (13:41 IST)
नाशिक मध्ये एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे मृतदेह जळालेल्या कारमध्ये सापडल्याने संपूर्ण नाशिकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव सुवर्णा वाजे आहे. त्यांनी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पतीने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सुवर्णा यांचे मृतदेह विल्होळी परिसरात स्वतःच्या कार मध्ये पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका चारचाकी वाहनात एक मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास घेत आहे. हे घातपात आहे की आणखी काही प्रकार आहे. ह्याचा तपास पोलीस लावत आहे. या घटनेने नाशिकात खळबळ उडाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्याच्या बातम्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे उत्तर