Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
डीजीपींनी राज्य सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांनी कथित पोलिस बदली रॅकेट प्रकरणी त्यांच्याकडील सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे बंद लिफाफ्यातून सोपवले आहेत. फडणवीस यांनी फोन टॅपिंग इंटरसेप्ट्स देखील आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेत हे सर्व पुरावे सादर केले आहेत.
२५ ऑगस्ट, २०२० रोजी फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल राज्याच्या डीजीपींनी सरकारकडे सादर केला होता आणि त्यावर सीआयडी चौकशीची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाई न करता तो अहवाल गृहमंत्र्यांकडे सोपवला आणि त्यावर आजतागायत कारवाई झाली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.