Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का ?

'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना दिला होता का ?
नागपूर , गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (15:03 IST)
'काँग्रेससोबत जाऊ' हा शब्द बाळासाहेबांना शिवसेनेने दिला होता का? असा प्रश्न विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. राज्यात सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्या. 1990 नंतर भाजपला दोनवेळा 100 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. मात्र हे सरकार हाराकिरीचे सरकार आहे, असाही टोला फडणवीस यांनी लगावला. नागपूर अधिवेशनात राज्यकालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. या चर्चेत फडणवीस यांनी 'सामना'मधले पवारांबाबतचे उल्लेख वाचून दाखविले. ज्यामुळे गदारोळ झाला.
 
मी 'सामना' वाचत नव्हतो पण आता सबस्क्रिप्शन लावले. पवारांबाबत काय काय बोलले गेले, उद्धव ठाकरेंबाबत काय काय बोलले गेले हे महाराष्ट्राला ठाऊक आहे असे म्हणताच गदारोळ झाला. त्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच टोले लगाविला. ज्यावरून शिवसेनेचे आमदार, मंत्री हे चांगलेच चिडले. माझा वेळ हेच लोक खात आहेत, माझ्या आरोपांना उत्तर देऊन असाही टोला फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितले होते की आमच्यापुढे सगळे पयार्य खुले आहेत. त्याच्या सोयीस्कर विसर शिवसेनेला पडला आहे.
 
25 हजार हेक्टरी मदत कोरडवाहू शेतीला आणि 50 हजार रुपये हेक्टर बागायती शेतीला देऊ असे आश्वासन मख्यमं‍त्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
 
अल्प भूधारक शेतकर्‍यांना हे आश्वासन देण्यात आले होते. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे आश्वासन  देण्यात आले होते त्याचे काय झाले? तुम्ही दिलेला शब्द तुम्हीच पाळला नाही. तुम्ही केंद्र सरकारला मदत मागितली होती पण घोषणा केंद्र सरकारच्या जीवावर केली होती का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा समूहाला झटका : मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष