Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसात अडकले मुंबईकर भुकेने व्याकुळ, गणपती बाप्पा आले मदतीला

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2019 (10:08 IST)
मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या न थांबता कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प होती. तर अनेक मुंबईकर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अडकून पडले होते, याच अडकलेल्या मुंबईकरांनाच्या मदतीसाठी गणेश मंडळे पुढे आली आहेत. यामध्ये परळचा राजा नरेपार्क मंडळाने अडकलेल्या मुंबईकरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांच्या नावाने यासंदर्भातील मेसेज व्हायरल झाला आहे.
 
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकले, दादर, परळ, माटुंगा स्थानकातही मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांच्या मदतीसाठी ‘परळचा राजा नरेपार्क’ मंडळाकडून जेवणाची सोय केलेली आहे. मुंबईकरांनी कुठलीही तमा न बाळगता परळ चा राजा नरेपार्क गणपती मंडपाजवळ संपर्क करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांनी केले आहे. त्यामुळे फक्त पैसे घेणारे मंडळ न राहता परळच्या राजाने खऱ्या अर्थाने मदत केली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: शिर्डी साई संस्थान मंदिरावर बॉम्ब टाकण्याची धमकी

जातीय जनगणनेवर मायावतींचे विधान, म्हणाल्या- भाजप आणि काँग्रेस दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे

पंक्चर दुरुस्त करणाऱ्याच्या प्रेमात पूजा आंधळी झाली: लव्ह जिहाद आणि धर्मांतर... मुश्ताकने धर्म लपवून लग्न केले होते, मोठा खुलासा

UK Visa यूके व्हिसा कसा मिळवायचा? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या टिप्स

महायुती सरकारने तनिषा भिसेच्या मुलांसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून उपचारासाठी 24 लाख दिले

पुढील लेख
Show comments