Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र दिनापासून ई-शिवनेरी धावणार

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:21 IST)
मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.  1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस उतरण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस नव्याने दाखल होणार आहेत. सध्या असलेल्या शिवनेरीच्या तिकीटाच्या तुलनेत ई शिवनेरीचे तिकीट कमी असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे पासून ही नवी सेवा प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.
 
दरम्यान इलेक्ट्रिक शिवनेरी बसमध्ये संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा मिळणार आहे. तर एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. सध्याच्या शिवनेरीच्या तिकीट दराच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या बसचे भाडे 350 रुपये असण्याची शक्यता आहे.
 
तर डिझेल बसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा खर्च कमी आहे. सध्या भारतामध्ये ‘फेम’ योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळामध्ये काही बस दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. शिवनेरी ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रीमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्वो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक जण त्याला प्राधान्य देतात. वरचे वर मुंबई पुणे प्रवास करणारे अनेक जण नियमित शिवनेरीने फिरतात. त्यामुळे हा प्रवासी कायम राहण्यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे.
 
काय आहे ई-शिवनेरीची वैशिष्ट्ये?
ई शिवनेरी बसची क्षमता 43 प्रवाशांची
एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमात
ई शिवनेरी संपूर्ण वातानुकुलित बस
आरामदायी आसन व्यवस्था
मोबाईल चर्जिंगची सोय
बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पुण्यामध्ये सरकारी शिक्षकाने केली पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला

भंडारा मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात

वन नेशन वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

कोळशाने भरलेल्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

पुढील लेख
Show comments